कोणा कशी कळावी?…वेडात काय गोडी … भाग १
२०१४ मध्ये त्या दोघांबद्दल लिहिले होते. हा जवळपास त्याचाच दुसरा भाग.
त्या दोघांबद्दल लिहिले त्यास बरीच वर्षे झाली. माझी ऑफिसमधील फेवरेट जोडी. मधल्या काळात बरेच काही बदलले. माझी कामाची जागा बदलली, मी दुसऱ्या बिल्डींग मध्ये शिफ्ट झाले, त्यामुळे आपसूकच ह्या जोडीचे दर्शन होईनासे झाले आणि मग मी हे सारे जवळपास विसरलेही.
पण अचानक या महिन्याभरात काही वेळा या जोडीतला तो एकटाच दुपारच्या चहाच्या वेळी माझ्या बिल्डींग मध्ये चहासाठी आलेला दिसला. आणि मग एकदम चुकल्यासारखे वाटू लागले की ती कुठे गेली? मधली चार वर्षे, IT कंपनीत हा खूपच मोठा काळ आहे. त्यामुळे प्रोजेक्ट बदलला, onsite गेली, क्लायंट लोकेशन ला गेली किंवा कंपनीच बदलली असे काहीही असू शकत होते. पण दर वेळी त्याला एकट्याला पाहताना काहीतरी चुकल्यासारखे वाटायचे, इतकेच नव्हे तर नंतरही काही काळ डोक्यात ते राहायचे, "एकटा का तो? ती का सोबत नाहीये? " उगीचच हळहळ :(
थोडा बदल झालाय त्याच्यात देखील, थोडे वय अजून दिसू लागले आहे, चेहेरा पूर्वीसारखा खुश दिसत नाही असे ही वाटून गेले. हे खरे का माझ्याच डोक्यातला खेळ राम जाणे. वय दिसू लागले तर मध्ये चार वर्षे गेली आहेत ना ?
अचानक गेल्या शुक्रवारी दुसऱ्या म्हणजे माझ्या जुन्या बिल्डींग मध्ये जेवायला जायचे ठरले. तिथे गेल्यावर अनेक आठवणींसोबत हे दोघेही आठवलेच. दुपारी दोन ही तशी जरा जास्तच गर्दीची वेळ. पूर्वी आमची आणि या जोडीची वेळ म्हणजे दुपारी १२. ३० ते १. ००. आवडती पाव भाजी घेऊन आम्ही एक टेबल गाठले, सवयीने आजूबाजूला नजर टाकली, तर माझ्या समोरच्याच टेबलवर तो बसलेला आणि अजून काही जण सोबत, पण ती मात्र नाही. हाय रे दैवा!
निमूटपणे जेवू लागले. पावभाजी आवडती असूनही बेचव लागू लागली. पण आश्चर्य ! पाचच मिनिटात ती कुठूनतरी आली, याच्या समोरची खुर्ची रिकामी होती, तिथे बसून सगळ्यांसोबत जेवू लागली. मला काय वाटले, कसा आणि किती अनाकलनीय असा आनंद झाला ते मला शब्दात नाही सांगता येणार. काही तरी हरवलेले गवसावे तसे हायसें वाटले मला. जी जशी, ज्या नात्यात आहे ती तशी "रब्बा, इस जोड़ी को हमेशा सलामत रखना" हे भाव ही मनात उमटून गेले.
सतत फक्त एकमेकांसोबत असणारे, एकमेकात छानसे गुंतलेले, एकमेकांची साथ सोबत आवडणारे दोन जीव इथपासून ते सर्वांसोबत असणारे ते दोघे असा प्रवास हे ही वाईट नक्कीच नाही. जवळपास सहा सात वर्षाचा हा प्रवास असेल त्यांचा ही, जे कोणते, जसे कसे त्यांचे नाते आहे, नाव असलेले, नसलेले पण ते टिकून आहे, दोघे सोबत आहेत, अजून काय हवे ? माझ्या मनापासून अनेकोत्तम शुभेच्छा या जोडीला, त्या नात्याला!!! :)
नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही
सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही
ना तालराग यांच्या बंधात बांधलेला
ना तालराग यांच्या बंधात बांधलेला
बंधात बांधलेला
स्वरमेघ मंजूळांचा बरसे दिशात दाही
सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही
नात्यास नाव आपुल्या...
गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा
गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा
मंझिलकी जयाची तारांगणात राही
नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही
सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही
नात्यास नाव आपुल्या