Wednesday, October 10, 2012

सांग सखया.........

चालताना तू थोडा थबकलास

नुसताच थबकलास का

दूरवर सोबत करण्याचा

विचार तुझा बदललास?


हाक मारताना तू अडखळलास

नुसताच अडखळलास की

ओठात माझेच नाव असण्याचा

तुझा रिवाज तू बदललास?


बोलताना तू जरासा थांबलास

नुसताच थांबलास की

माझ्यापाशीच मन मोकळे करण्याचा

तुझा हक्कच तू विसरलास?


निरोपाच्या क्षणी तू आवंढा गिळलास

नुसताच आवंढा गिळलास की

आयुष्यातून मला वजा करताना

स्वत:लाच भागून मोकळा झालास?


खरं सांग, सारे काही विसरलास? सारे काही संपले?

खरच संपलय कि

आजही प्रीतीचे नाव घेता

तुझे जग सारे माझ्याशीच येऊन थांबलंय

5 comments:

  1. अनघाताई,
    खूप सुंदर कविता. कधी कधी काही situations मध्ये काळात नाही आपल्याला लागतोय तो अर्थ खरा कि जो व्यक्त होऊ पाहतोय तो अर्थ शोधावा. पण त्या एका क्षणाला येणारा अन्वयार्थ खूप वेळ पाठलाग करत राहतो हे हि तितकंच खरं. नाही का? तुम्ही तो मूड खूप अचूक पकडलाय. अशाच व्यक्त होत राहा.
    उत्तमोत्तम लिखाणासाठी शुभेछा.

    अवांतर: तुम्ही आणि मी एकाच परिसरातल्या आहोत, चिंचवडच्या

    ReplyDelete
  2. श्रद्धा आभार आणि ब्लॉगवर स्वागत!

    तू पण चिंचवड मधेच राहतेस? कुठे? एकदा भेटूयात.

    ReplyDelete
  3. सुंदर..

    रच्याक, कवितेत चिंचवड कुठे आलंय ते पामराला कळलं नाहीये ;) (हघे)

    ReplyDelete
  4. हेहेहेहे हेरंब >>> अवांतर वाचन :D

    ReplyDelete
  5. हेरंब
    +१ प्रसंग आहे खरा :)

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!