ऑफीस मधे माझया बाजूच्या क्यूबिकल मधे एक महान आत्मा बसतो. एक गमतीदार व्यक्तिमत्व आहे ते. एखादी गोष्ट तुम्हाला गूगलवर सापडत नसेल तर फक्त त्याला सांगा...अर्ध्या तासात तो तुम्हाला ते मिळवून देणार. एखादी मैफील तुम्हाला आठवते आहे आणि त्याचा रेकॉर्डिंग मिळत नाहीए, त्याला सांगा... आणि असं असतानाही आमच्यात खूप कमी संवाद होता.
सद्ध्या ऑफीस मधे माझी सामानाची बांधा बांध सुरू आहे :) त्यामुळे मी काही डेटा त्याला ट्रान्स्फर करत होते. त्यात त्याला एक फराझ नावाचं डॉक्युमेंट दिसलं, आणि आमच्यात संवाद सुरू झाला.त्याच्या कडे असंख्य गाणी आणि गझलांचा खजिना आहे. तो जगजितसिंग यांचा शिष्य आहे. असं अनेकदा घडतं, की आपल्या जवळच्या बरोबर संवाद नसतो आणि फेसबूकवर मात्र आपण शेकडो मित्र मिरवत असतो. तसंच काहीसं हे देखील! बोलता बोलता क्षणात त्याने जवळपास 8 जी बी चा डेटा मला ट्रान्स्फर केला, ज्यात मेहन्दी हस्सन आहे, मदन मोहन आहेत, जयदेव आहेत. त्यापैकीच एक गझल फैज अहमद फैज यांची....मेहन्दी हस्सन यांच्या आवाजातील....खूप सुंदर आहे....
आये कुछ अब्र कुछ शराब आये
उसके बाद आये जो अज़ाब आये
बाम-ए-मीना से माहताब उतरे
दस्त-ए-साक़ी में आफ़ताब आये
कर रहा था ग़म-ए-जहाँ का हिसाब
आज तुम याद बेहिसाब आये
हर रग़-ए-ख़ूँ में फिर चराग़ाँ हो
सामने फिर वो बे-नक़ाब आये
उम्र के हर वरक़ पे दिल की नज़र
तेरी मेहर-ओ-वफ़ा के बाब आये
इस तरह अपनी ख़ामुशी गूँजी
गोया हर सिम्त से जवाब आये
'फ़ैज़' की राह सर-ब-सर मंज़िल
हम जहाँ पहुँचे कामयाब आये
No comments:
Post a Comment
हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!