अनेकदा मी माझ्याच पाऊलखुणा पुन्हा पुन्हा शोधत राहते
त्याच जुन्या वळणांवर आठवणी नव्याने जागवू पाहते ||
अनेकदा मी मलाच विसरू पाहते
अन श्वासांची गणिते मांडत राहते ||
अनेकदा मी साधं सरळ सोपं जगायचं नाकारू जाते
अन याच जन्मी पुन्हा नव्याने रुजू पाहते ||