कुमार गंधर्वांचा गाणं ऐकणं ही एक आनंददायी गोष्ट. अनेकदा त्यांनी लावलेला "सा" अंगावर काटा आणतो, रोमांचित करतो. एखादी पावसाळी संध्याकाळ. त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम, अगदी कमी उपस्थिती, पण तुमच्या सुदैवाने ते मात्र कार्यक्रम स्थळी वेळेवर पोहचले आहेत. त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे कितीही कमी लोक असले तरी ते गाणं सुरु करणारच. बाहेर कोसळणारा वरुण आणि आत ही बरसात. अगदी स्वरात चिंब भिजवून टाकणारी. आपोआप डोळे मिटून घेता यावेत, आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचा भान निघून जावं. कानापर्यंत पोहोचणारा प्रत्येक सूर, कानात, मनात साठवता यावा. आता कुमार गंधर्व नाहीत, त्यांना प्रत्यक्ष समोर बसून गाताना ऐकण्या इतकी मी नशीबवान नव्हते. तरीही......
छानशी सुट्टी असावी. सर्व सुट्टी स्पेशल कामे बाजूला सारून हाती असलेला वेळ मनासारखा घालवता येण्याची मुभा असावी. घरात नि:शब्द शांतता असावी. बाहेर ही कुंद अशी हवा असावी. कधी कधी अशी हवा मला खूप आल्हाददायक वाटते. दुपारी मनाजोगे जेवण, नंतर एक छानशी डुलकी व्हावी. उठल्यानंतर, फ्रेश होवून टि.व्ही. समोर जावून बसावे. सगळे पडदे सारून सुंदरसा सिनेमा पाहण्याकरिता मनाजोगी वातावरण निर्मिती व्हावी. आणि एखादा आवडता, सिनेमा शांतपणे बघता यावा. कोणत्याही जाहिरातीशिवाय, कोणतही व्यत्यय न येता. कोणताही फोन, मोबाईल, घराची बेल काही काही वाजू नये या वेळी. एखादी हिंदी किंवा इंग्लिश सांगीतिक प्रेमकहाणी. रोमन हॉलिडे किंवा चोरी चोरी सारखे, राजकपूर किंवा देव आनंद चा एखादा हळूवार. हाणामारी, गुन्हेगारी, किंवा आर्ट फिल्म्सच्या नावाखाली दाखवले जाणारे नको इतके वास्तव यातली कोणतीच गोष्ट मला आवडत नाही. हळू हळू मी सोफ्यावरून खाली जमिनीवर उतरते, आणि माझ्या सोबत सोफ्यावरचे लोड, तक्के ही. मधेच काही क्षण थांबून एखादा कप कॉफी बनवून घेवून तिचा आस्वाद घेत पुन्हा सुरुवात. हळू हळू मग संध्याकाळ होवू लागते, घरात साठवलेला हलकासा अंधार थोडा गडद होवू लागतो. त्या नायिकेच्या जागी मी आता स्वत:ला पाहू लागते. एक हलकीशी धुंदी मनावर पसरलेली असते. खरतर खूप खास नाही यात तरीही....माझ्यासाठी असं सर्व घडणं हाच एक कपिला-षष्ठी चा योग येण्याजोगी गोष्ट आहे.