Saturday, October 6, 2012

क्षणभर विश्रांती ...

१५ दिवसांपूर्वी मी हातात "हिंदू - जगण्याची एकसमृद्ध अडगळ " वाचायला  घेतली. मुळात हे पुस्तक माझ्याकडे कसे आले हीच एक स्टोरी आहे. इतकी वर्षे पुस्तके कधी "buy " कधी "borrow " करत वाचली जात होती. मागच्या वर्षी ठरवले की आता फक्त "buy". नवऱ्याला म्हटलं की एखादा दागिना किंवा भारी साडी कमी घेतली गेली तरी चालेल...पण घरात माझी अशी स्वत:ची लायब्ररी असायला हवी. त्याची हरकत असायचं पण कारण नव्हते. त्या पूर्वी पण पुस्तके अनेकदा विकत घेतली जात असत, पण त्यामागे हा विचार नसे. मग गेल्या दिवाळीत अनेक पुस्तके माझ्या घरी दाखल झाली. जेव्हा ती घ्यायला अक्षरधारा मध्ये गेलो, तेंव्हा आम्ही दोघे ही आपापल्या आवडीची पुस्तके बघत होतो मी एक मोठा गठ्ठा घेवून बिलासाठी घेवून आले तेंव्हा नवरा हे पुस्तक घेवून आला. तरी मी त्याला विचारले " तू वाचणार आहेस का हे?" तर म्हणे "हो" मग मनात विचार आला कधी नव्हे तो बाबा स्वत: पुस्तक वाचेन म्हणतो तर असू देत. जेमतेम ५/१० पाने वाचून ते ठेवून दिले ते आजतोवर त्यास हात लावला नाही. वर्षभरात माझी बाकीची सर्व पुस्तके वाचून झाली. एकसलग वाचले तर दिवसाला किमान ३०० पाने वाचतेच.(घरात बाकी कामे मग कोण करतं, हा प्रश्न कोणी प्लीज विचारू नये), यातली अनेक पुस्तके मी पूर्वीच वाचलेली असल्याने, पुन:प्रत्ययाचा आनंद घेत मी ती वाचली. काही नव्यानेच वाचली. गेल्या महिन्यात काही ना काही कारणाने माझे अक्षरधारा, किंवा अप्पा बळवंत चौकात जाणे होत नाहीये. त्यामुळे वाचण्यासाठी हे एकच पुस्तक आता शिल्लक राहिले होते. वाचायला घेतले, १००/१२० पाने वाचून झालीत, पण रोज घर, ऑफिस, घर  आणि नंतर वेळ मिळेल त्यात फेसबुक, ब्लॉग यात माझा इतका वेळ खर्ची पडतोय की हे पुस्तक नुसतेच डोक्याशी पडून आहे. तर आता हे पुस्तक पूर्ण वाचून झाले की मगच फेसबुक, ब्लॉग. मधेच एकदा "English Vinglish" पण बघायचा आहेच :)

4 comments:

 1. हे पुस्तक वारंवार वाचण्या साठी आहे ,kind of reference book
  त्यामुळे विकत घेतले हे चांगले केले

  ReplyDelete
  Replies
  1. नितीन ब्लॉगवर स्वागत! अगदी मलापण असेच वाटले हे पुस्तक हातात घेतल्यावर. पण खूप सवडीने शांतपणे वाचावे लागणार असे दिसते. कदाचित २ वेळासुद्धा.

   Delete
 2. वाचा आणि मग लिहा त्याबद्दल - तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल या पुस्तकाबद्दल.

  ReplyDelete
  Replies
  1. साविताताई ब्लॉगवर स्वागत!
   प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार. बघूया कसे जमते ते.

   Delete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!