अशा कातर वेळी
खिडकीशी उभी मी
पहात राहते क्षितिजापर्यंत
पोहोचलेले हे गाव
नजरेच्या टप्प्यात अनेक
ओळखीच्या जागा
तिथपर्यंत नेतात मला
आठवणींच्या पायवाटा
आठवणी तरी कशा ?
नुसत्याच सैरभैर
कोणाला आवतण देते कोण
कोणाचा हात धरून येतं कोण
असाच असतो
एक एक दिवस त्यांचा
त्यांच्या साथीने तुझ्यासह
काही क्षण जगण्याचा
भरभरून जगते मी हे क्षण
ते माझे आपले असतात
तुझ्यापेक्षा तुझ्या आठवणीच
माझी जास्त सोबत करतात
masta ga. तुझ्यापेक्षा तुझ्या आठवणीच माझी जास्त सोबत करतात ! kya bat hai. khoop awadale.
ReplyDeleteAabhar Mohana!
ReplyDeleteKhul chan !
ReplyDeleteWelcome on this Blog and thanks Mayuri!
ReplyDelete