या जगात मी एक अनोळखी
रात्रभर डोळे टक्क उघडे ठेऊन
सकाळी उठणारा
सकाळी उठणारा
कालच्याच प्रश्नांना आज पुन्हा सोडवू लागणारा
प्रश्न अनोळखी त्याहून उत्तर अनोळखी
या जगात मी एक अनोळखी
भरल्या ताटावरून रोज
उपाशी उठणारा
जगातले दैन्य भूक यावर विचार करणारा
विचार अनोळखी त्याहून वेदना अनोळखी
या जगात मी एक अनोळखी
कोणतीच नाळ न जुळता
साऱ्या पाशात अडकलेला
साऱ्या नात्यांचा गुंता सोडवू पहाणारा
नाती अनोळखी त्याहून गुंते मला अनोळखी
No comments:
Post a Comment
हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!