आज पुन्हा एकदा नव्याने
अलवार जाग आली
रातीची बरसात तुझी चाहूल देऊन गेली
आज पुन्हा एकदा नव्याने
मी न्याहाळले मलाच
एकटक तुझी नजर माझे काळीज छेदून गेली
आज पुन्हा एकदा नव्याने
माळला मी गजरा
फुले मोगऱ्याची गंध तुझाच पसरवून गेली
आज पुन्हा एकदा नव्याने
तुझ्या सयीत रमले
ती चांदणभूलच माझी ओंजळ रिती करून गेली
आज पुन्हा एकदा नव्याने
मी काही क्षण जगले
लागलेली तुझी आस सखया मग मलाच मिटवून गेली
क्या बात है| १३ ला तुमच्याकडे येऊन गेल्यावर दुसऱ्या दिवशीच तू हि कविता केली आहेस आणि मी आज वाचली. खरच sorry. सगळेच सारे जुळून आले आहे, पहिल्या ओळीचे आणि तिसऱ्या ओळीचे सातत्याने जुळलेले यमक, कवितेत जाणवणारी अंगीभूत लय, प्रत्येक कडव्या गणिक फुलत गेलेली मध्यवर्ती संकल्पना आणि बरोबर समेवर आणणारे शेवटचे कडवे. खूप लिही ------
ReplyDeleteअनघा, कविता आवडली . नितिन
ReplyDeleteधन्यवाद नितिनजी.
ReplyDelete