एखादी कल्पना मनात यावी आणि शब्दांनी तिचा पाठलाग करत एका पाठोपाठ हात धरून यावे आणि कवितेचा जन्म व्हावा, हे भाग्य कधीतरीच लाभणारे. त्यामुळे जशी सुचत गेली तशी च्या तशी कोणत्याही संस्कारांशिवाय ही कविता!
अश्रुंचे पूर
ते पुसणारे हात
का कितीतरी दूर
आठवणींचा उमाळा
वेदनेचे कातर सूर
ते ऐकू जाणारे कान
असती मैलोनमैल दूर
नजरेची साद
नयनच आतूर
प्रतिसाद देणारे डोळे
आता कितीतरी दूर
पौर्णिमेची रात्र
चांदणे टिपूर
चांदण्यांनी ओंजळ भरणारा
मात्र चंद्रासारखाच दूर
सहवासाची ओढ
शब्दांचे काहूर
समजणारया मनानेही
का राहावे मनापासून दूर
विरहवेदना, आवेग छान व्यक्त झाला आहे अनघा.
ReplyDeleteधन्यवाद मोहना!
DeleteApratim bolke shabd aani bhav, khupach Chhan ����!!!
ReplyDeleteधन्यवाद आनंद !!
Delete