अनेकदा तुमच्या ओळखीची, शेजारची, नात्यातली सगळीच मंडळी काही तुमच्या फेसबुकात फ्रेंड्स-लिस्ट मध्ये नसतात. कधी कधी तुम्हाला कल्पना पण नसते ही व्यक्ती फेस बुकवर आहे ते. सध्या काही दिवस मी अनुभवलेली गोष्ट- अशांपैकीच एखाद्या व्यक्तीचे निधन होते. मध्ये बरेच दिवस जातात. आणि काही दिवसांनी थोपू तुम्हाला "People You may Know - add friend " असं म्हणत त्यांचा प्रोफाईल दाखवत राहते. मी मनात म्हणते " आता कुठून रे बाबा,
यांना add करू? नाही रे माझी रिक्वेस्ट त्यांच्या पर्यंत पोहोचणार, आता फार उशीर झालाय"
माझ्या लांबच्या नात्यातल्या एका हुशार काकांनी वर्षभरापूर्वी या जगाला कायमचं अलविदा म्हटलं. ते फेस-बुकवर असू शकतील असे मला कधी वाटलेच नाही. मुळात मी स्वत: फेस- बुक वर जेमतेम १०/११ महिन्यांपूर्वी दाखल झाले. आणि आता थोपू मला सतत यांचा असा रेफरन्स देत राहते.
माझ्या एका कॉलेज मधल्या मैत्रिणीचा नवरा नुकताच एका भीषण अपघातात बळी गेला, ते ही प्रोफाईल मला अशाच रीतीने दाखवले जाते आहे. त्याच्या प्रोफाईल वरील त्या कुटुंबाचा हसरा एकत्र फोटो, आता मात्र मनाला वेदना देतो.
प्रत्येक वेळी खूप वाईट वाटते. जवळपास १०० पैकी ९९ केसेस मध्ये त्यांच्या जवळच्या कोणापाशी त्यांचे अकौंट डीटेल्स असण्याची शक्यता नसते. काय करता येईल? काही तरी यावर उपाय शोधावा लागेल......

Soppa upay ahe...tyaana add kara. Nahi karu shakat gelela manus tumhaala add pan tumhi ekda friend request pathavli ki sarkhe recommendations nahi yenar, kivva recommendation deny karta yet asel tar paha.
ReplyDeleteBaghate asa karun....Thank you.
ReplyDeleteमाझ्या माहितीप्रमाणे कुटुंबीय फेसबुकला कळवू शकतात आणि फेसबुक खातं बंद करतं.
ReplyDelete