ती "अरे, नुसता संध्याकाळचा रिकामा वेळ त्या टी. व्ही. समोर बसून वाया घालवतोस, काहीतरी नवीन शिक, एखादा अपूरा छंद जोपास पुन्हा"
तो " त्याने काय होईल?"
ती " म्हातारपणी वेळ कसा घालवायचा याचा प्रश्न पडणार नाही, मन रमेल"
तो " ते तसं ही रमेल"
ती " ते कसं? की रम मध्ये रमेल?"
तो " म्हातारपणी कसा वेळ घालवायचा याचा माझा आराखडा अगदी पक्का आहे"
ती "हो? कळू तरी दे मला काय तो"
तो " हे बघ, पहाटे साडेपाच ला उठेन, स्वत:पुरता चहा बनवून घेवून चालायला बाहेर पडेन. तासभर चालून येणार, मग परत येऊन घराच्या बागेत बसून मस्त तासभर पेपर वाचेन, चहा, नाश्ता होईल, मग तयार होवून पुन्हा बाहेर. बँकेची वगैरे कामे करून १२ वाजे पर्यंत घरी परत. बाहेर नाही पडलो तर मग रोज एक रूम आवरून ठेवेन. मग मस्त जेवून एक तास भर झोप."
ती " अरे वा! मस्त!!! पण रूम आवरायला आधी तिथे पसारा असला पाहिजे ना? "
तो " पुढे ऐक. मग दुपारचा चहा, मग थोडे बागकाम, एकीकडे छानसे संगीत चालू. संध्याकाळी प्राणायाम करून सहा वाजता एखाद्या क्लब मध्ये जाणार. रात्री ९ वाजेपर्यंत परत. जेवायचं, थोडावेळ टी.व्ही. बघितला की संपला दिवस"
ती " सारे तुझेच फक्त प्लान्स झाले, यात मी कुठे आहे?"
तो " आहेस ना, यातला चहा, नाश्ता, जेवण बनवणारी तूच आहेस."
ती " आणि??? बाकी वेळा मी काय करेन?"
तो " तू ? तू काय करशील??? तू तर ऑफिसला जाशील"
ती " कसं काय ? तू म्हातारा होशील तरी मी नोकरीच करत राहीन? आणि जरी करत असले तरी रोज उठून ऑफिसमध्ये थोडी ना जाईन, जे काही असेल काम ते घरूनच नाही का करणार?"
तो " अरे बापरे, तू सारा वेळ घरीच? हा एक त्रासच! लक्षातच आला नव्हता माझ्या"
Hahaha!!! Majhe vadil nuktech retire jhaalet anhi tyache pan asech masta plans ahet retirement enjoy karnyache. Haa samvaad agdi amchyach ghaari ghadlay ase vatle.
ReplyDelete- Priti
Thanks Priti!
ReplyDelete