पहाता पहाता दिस सरले
अवसेच्या रातीस चांदणे फुलले
चांदणे फुलले सखयाच्या आकाशी
त्याचा प्रकाश पडे माझ्या अंगणी
अवसेच्या रातीस चांदणे फुलले
चांदणे फुलले सखयाच्या आकाशी
त्याचा प्रकाश पडे माझ्या अंगणी
पहाता पहाता रोप बहरले
कोरड्या मातीतून बीज अंकुरले
बीज अंकुरले सखयाच्या दारी
त्याच्या सावलीत मी विसावले
कोरड्या मातीतून बीज अंकुरले
बीज अंकुरले सखयाच्या दारी
त्याच्या सावलीत मी विसावले
पहाता पहाता चित्र साकारले
नात्यांचे रंग घेऊनी जे जन्मा आले
रंगाचा कुंचला सखयाच्या हाती
त्याच्या रंगी मी कशी रंगुनी गेले
नात्यांचे रंग घेऊनी जे जन्मा आले
रंगाचा कुंचला सखयाच्या हाती
त्याच्या रंगी मी कशी रंगुनी गेले
पहाता पहाता मैफल सजली
अनवट सूर कसे कोणी छेडले
सुर उमटती सखयाच्या गळ्यातूनी
त्याच्या सुरावटींनी कसे मला नादावले
पहाता पहाता वर्ष झालेअनवट सूर कसे कोणी छेडले
सुर उमटती सखयाच्या गळ्यातूनी
त्याच्या सुरावटींनी कसे मला नादावले
तू माझा अन तुझी मी झाले
नात्याचे सखया बंध हे रेशमी
साता जन्मांचे जणू धागे जुळले