आज सकाळी उठून चहाचा मग घेऊन नेहमीप्रमाणे टेरेसमधे गेले, इतकी मस्त थंडी पडली होती.....अजून दिवाळी सुरू नाही झाली त्यामुळे हवाही प्रदूषीत नव्हती. मनात विचार आला, आता सकाळी चालायला जायला सुरूवात करायला हवी. पावसाळा संपला...आता न जाण्यासाठी काही कारण नाही.
....नाही नाही......कारणं अशी संपत नाहीत...खूप थंडी आहे, उन्हाळा आहे, काल रात्री खूप उशिरा घरी आले, काम खूप आहे, अभ्यास करायचा आहे, पाहुणे आहेत....न संपणारी कारणे. कशा ना काही गोष्टी आपण मनापासून टाळतो? आजकाल रोज दिवसभरात अनेकदा माझया मनात येतं.....उद्यापासून जिम, चालणे, योगा काहीतरी सुरू करेन....पण तो उद्या काही उजाडत नाही. काही तरी कारण सापडताच न जाण्यासाठी.
१ तारखेपासून, सोमवारपासून, नवीन वर्षाचा असे अनेक संकल्प करून झाले, गेल्या वर्षी या तीन्ही गोष्टी एकाच दिवशी जुळून आल्या पण माझा संकल्प जिथल्या तिथेच.अशी न आवडणार्या कामांची माझी एक मोठी लिस्ट आहे. जसं की जेवणानंतर टेबलाची आवाराआवारी, बँकेत जाणे, वाढदिवसाच्या दिवशी येणार्या फोनवर बोलणे, तसा अधूनमधून त्यांचा क्रम बदलत राहतो, पण व्यायाम कायम आपले प्रथम स्थान टिकवून आहे. किती प्रयत्न करून झाले, किती जिम ना देणग्या देऊन झाल्या पण नाही ती आवड मी काही केल्या निर्माण नाही करू शकले. मग कधीतरी समर्थन बुद्धिजीवी असण्याचं. कळतं पण वळत नाही, याचं यापेक्षा उत्तम उदाहरण दूसरं मिळणार नाही.

No comments:
Post a Comment
हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!