दीपावली ३ दिवसांवर येऊन पोहचली, अजून मी घरात एकही फराळाचा पदार्थ बनवला नाही. काल रात्री उशिरा घरी पोहचले, बिल्डिंग मधे शिरताना सहज वर लक्ष गेलं, एका घरी आकाशकंदील लागला होता, विचार आला अरे बापरे अजुन आपण याचा विचारच केला नाहीये. आता या सार्या गोष्टींसाठी वीकेंड ची वाट पाहावी लागणार, किती कामे ठेवली आहेत त्या दोन दिवसांसाठी!
घरात शिरले समोर लक्ष गेलं, आणि चकित झाले, घर उजळून गेलं होतं, टेरेसभर चांदण्या उजळल्या होत्या. छोट्या छोट्या गोष्टी किती आनंद देऊन जातात नाही? मग आठवत राहिली लहानपण ची दिवाळी. किती आधीपासून त्याचे वेध लागायचे. कारण घरात फराळाची तयारी सुरू होत असे, पणत्या शोधून ठेवल्या जात, आकाशकंदील नवा बनवला जात असे, मला किल्ला करायला खूप आवडत असे. आम्ही जिथे राहत होतो तिथे मी एकमेव मुलगी होते जिला किल्ला करण्यात इँटेरेस्ट होता. खूप मजा वाटायची त्यात मला. ती सवय आजही टिकून आहे .....आता मी किल्ले मनातल्या मनात बांधते.
आईने लाडूसाठी पाकात टाकलेला रवा, खवा वाटीत घेऊन खायला खूप आवडायचं मला....पण मिळायचं नाही कारण नैवेद्य दाखवायचा असायचा. कपडे खरेदी हा एक आवडता उद्द्योग....तसा तो आज ही आहे..... पण आता ती मजा वाटत नाही. माझे बाबा खूप सारे फटाके घेऊन यायचे, त्याची तिघात वाटणी होत असे. मग त्यात शेवटी भांडभांडी होत असे. सर्वात जास्त फटाके मी उडवत असे. दोन वेळा फटक्या मुळे भाजल्यावर देखील. नारकचतुर्दशीच्या दिवशी पहिली माळ कोण लावणार अशी चुरस असे. खरच इतक्या सकाळी उठत असू की सकाळी ७ पर्यंत तेल, आंघोळ, फटाके, फराळ सगळं होत असे.....मग पर्वती चढायला जाण्याचा कार्यक्रम. इतकी मजा यायची.
लगेच नंतर आजीकड़े जात असू. आजकाल बोलावल्याशिवाय सख्खे नातेवाईकही एकमेकांकड़े जात नाहीत.
आता सगळं बदललं. सार्या गोष्टी पैशाने उपलब्ध झाल्या, वेळ दुर्मिळ झाला.आता पर्यावरणाच्या नावाखाली फटाके बंद झाले. फराळाचे पदार्थ सतत घरात दिसू लागले, आणि सारी मजा हरवून गेली.
Nostalgic and yes very true...because everything now available on fingertips...now instead of aai-mavshi jindabaad...we could say ..."chitale jindabaad"
ReplyDeleteलहानपणीची दिवाळी आठवली. खरचं मोठे झाल्यावर पैसे असून देखील खरेदी करण्याची मजा लहानपनासारखी येतच नाही काय तो लहानपणाचा रुबाबा असायचा मामा कपडे घेणार पप्पा फटके घेणार खरेच परत लहान होवं वाटयाले.........
ReplyDeletepaisa bahot kuchh hai lekin sabkuchh nahi kharch aahe lahanpan dega deva mungisakhrecha theva
ReplyDelete