अहमद फराजशिवाय जर अजून कोणी साध्या शब्दात आशयघन लिहीत असेल तर ते म्हणजे गुलजार. त्यांची अशीच एक रचना म्हणजे ही कविता..........
आदतन तुम ने कर दिए वादे
आदतन हम ने ऐतबार किया
आदतन हम ने ऐतबार किया
तेरी राहों में हर बार रुक कर
हम ने अपना ही इन्तज़ार किया
हम ने अपना ही इन्तज़ार किया
अब ना माँगेंगे ज़िन्दगी या रब
ये गुनाह हम ने एक बार किया
ये गुनाह हम ने एक बार किया
किती उशिरा वाचतोय तुझा हा चतुरस्त्र ब्लोग - गुलजारांची सगळी गाणी आवडतात, त्यातले काव्य मोह घालते आणि ते ज्ञानपीठ मिळविण्याइतके मोठे कवी आहेत हे ठाऊक असूनही कधीही वेळ काढून त्यांच्या कविता वाचल्या नाहीत. तुझ्या मुळे त्यांची आज पहिल्यांदा कविता वाचली आणि वाचता वाचता राहवले नाही आणि त्याच्या ओळी मराठीत मनावर प्रतिध्वनित होत गेल्या. त्यांची क्षमा मागत त्यांच्या ओळींचा मनात उमटलेला अनुवाद लिहित आहे
ReplyDeleteसवयीने तू दिलीस वचने
सवयीने विश्वास ठेवला आम्ही
तुझ्या रस्त्यावर थांबून नेहमी
स्वतःचीच वाट पहिली आम्ही
नाही मागणार देवा आता जीवन
हा गुन्हा एकदा केला आम्ही ||
रविदा आभार! वेळ काढून सद्ध्या तुम्ही तो वाचताय याने मीच भारावून गेलीये!
Deleteमला जाणवलेला अर्थ थोडा वेगळा होता-
तेरी राहों में हर बार रुक कर
हम ने अपना ही इन्तज़ार किया
कारण तो आणि ती आता वेगवेगळे नाहीच आहेत, त्यामुळे ती सोबत नसताना तो ही कुठेतरी हरवलेलाच असतो ना? तिचं भेटणं हीच स्वत:पर्यंत पोहोचण्याची एकमेव शक्यता.
अब ना माँगेंगे ज़िन्दगी या रब
ये गुनाह हम ने एक बार किया
ती म्हणजेच हे जीवन, ती म्हणजेच रब. आता तीच येणार नसेल तर, इथे कोणाला हवाय तो देव किंवा हे आयुष्य?