आजकाल थोडा बदल झालाय, अचानक मी लताभक्त झाले आहे. जवळपास १०० गाणी माझया संग्रही आहेत. लता दीदीन्च्या गाण्याने वेड लावलाय. अगदी त्यांच्या पहिल्या गाण्यापासून अनेक उत्तम गाणी मी सदैव ऐकत असते. त्यांच्या गोड आणि नाजूक आवाजाची मोहिनी काही उतरत नाही. त्यांच्या आवाजावर असलेला नुर्जाहांन चा प्रभाव, नंतर त्या प्रभावातून बाहेर आल्यानंतरचा सुरेल गळा. ह्या सम हाच. कशाचीही उपमा देताच येत नाही. कितीही वर्णन केलं तरी अपुरेच.
लता आणि रोशन यांच्या अनेक सुंदर सुरावटी आजही तितक्याच मनाला भावतात. मला कधी कधी या गाण्यांच्या चिरतारुण्याचं आश्चर्य वाटतं, माझया मागची पिढी, माझी पिढी याच सुरांवर आम्ही पोसलो, वाढलो, समृद्ध झालो; पण माझया पुढच्या पिढीलाही यानाच ऐकताना पहिलं की मी चकित होते.
काही गाणी हृदयात कळ उठावतात, काही डोळ्यात पाणी आणतात, काही तो प्रसंग समोर जिवंत उभा करतात. असंच हे एक गाणं, ममतामधील....नुसता गाणं ऐकूनही पुरतं दृष्य समोर उभा राहतं. लतादिंचा आवाज सगळा दर्द पोहचावतो तुमच्यापर्यंत.
रहते थे कभी जिनके दिल में, हम जान से भी प्यारों की तरह
बैठे हैं उन्ही के कूंचे में हम, आज गुनाहगारों की तरह
दावा था जिन्हें हमदर्दी का, खुद आ के पुछा हाल कभी
महफील में बुलाया हैं, हम पे हसने को सितमगारों की तरह
बरसों के सुलगते तम मन पर, अश्कों के तो छींटे दे ना सके
तपते हुए दिल के जख्मों पर, बरसे भी तो अंगारों की तरह
सौ रूप भरे जीने के लिए, बैठे हैं हजारो ज़हर पिए
ठोकर न लगाना, हम खुद हैं गिरती हुयी दीवारों की तरह
No comments:
Post a Comment
हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!