मला लहानपणी शाळेतली प्रयोगशाळा खूप आवडत असे. विशेषत: chemistry ची lab . नशिबाने तिथे सदैव राहणे जमले नाही. तरीही मी नेहमी म्हणते, माझं किचन ना ते किचन नाही ती माझी प्रयोगशाळा आहे. जिथे मी रमते आणि मनापासून माझे प्रयोग चालू असतात. पदवीधर झाल्या झाल्या लग्न केलं तेंव्हा ना धड गोल पोळ्या सुद्धा लाटता येत नसत मला. पण स्वत:चा असं एक किचन मिळालं आणि माझा तेथे मुक्त वावर सुरु झाला. इतके म्हणून मी येथे प्रयोग केलेत ......अनेक यशस्वी, अनेक अयशस्वी, पण माझ्यासाठी ते फक्त प्रयोग नसतात. ते माझं घडणं असतं.
या ब्लॉगमधून मी शेअर करणार आहे हाच माझा प्रवास. स्वैपाकघरात काहीही फारसं न येण्यापासून आता स्वघोषित "बेस्ट कूक" पर्यंतचा.
माझं किचन हे म्हणजे माझं एक स्वत:चं राज्य आहे, जिथे फक्त माझाच अंमल चालतो, जिथे इतर कुणाला फारशी लुडबूड करायला फारसा वाव कधी मिळत नाही. अनेक किस्से घडतात येथे, अनेक कौतुकाचे क्षण अनुभवलेत मी माझ्या या चिमुकल्या विश्वात, अनेक फसलेल्या प्रयोगातून मी काही तरी नवीन घडवलंय, कधी तरी एखाद्या रुसलेल्या पाककृतीने मला रडवलं देखील आहे. माझ्या करीअर इतकीच दुसरी समाधान देणारी दुसरी कोणती गोष्ट असेल तर ते माझं किचन. या विषयी बोलत राहीनच यापुढे...........

आम्ही सारेच खवय्ये मध्ये फसलेला पदार्थ कोणता ? असा प्रश्न प्रशांत करतो.
ReplyDeleteमी असे विचारेन तुमचा जमलेला पदार्थ कोणता ?
म्हणजे एखादी पहिल्यांदा केलेली अवघड पाककृती अपेक्षेपेक्षा जास्त जमून आलेली .
वाचण्यास उत्सुक
लिहिणारच होते मी यावर, तशा प्रयोग करत जमलेल्या काही रेसिपीज आहेत. एक पोस्ट केलीये. मुळात स्वयंपाक करणे हे काही रॉकेट सायन्स नाही. कोणतीही गोष्ट जर तुम्ही अगदी "दिलसे" करत असाल आणि थोडी खाण्याची आणि खिलवण्याची आवड असेल तर मग सारे काही सोपे होवून जाते.
ReplyDeleteक्षमस्व, स्वयंपाकगृहात रॉकेट सायन्सपेक्षाही महत्वाचे तंत्रज्ञान वापरले जाते की जिथे फुसक्या शोभेच्या फटाक्यात मसाला भरला की तो शोभेचा फटाका अंतराळात-ही झेप घेऊ शकतो आणि मग काय आ-काश ठेंगणे-च वाटते ना?
ReplyDeletete nakkich science nahi..........."dilse" ghadavavi ashi kala aahe, ani jamun yenari pratyek recipe hi ekamev ashi kalakruti!!!
ReplyDelete