ही गोष्ट माझी नाही...पण मला ती आजकालच्या माझया आयुष्याशी खूप जवळची वाटली
कॉफी
पावसाची रिपरिप चाललेली. रस्त्याच्या दुतर्फा झाडं. ओला डांबरी रस्ता. ओल्या रस्त्याच्या काळा रंग आणि रस्त्याच्या बाजूला दाटलेला हिरवा रंग ह्याचं सुंदर काँबिनेशन. रस्त्याच्या मधोमध ती दोघं चाललेली. एक तो आणि एक ती. दोघांकडे मिळून एकच छत्री. छत्री रंगीबेरंगी आहे. म्हणजे त्याची नक्कीच नाही. तिचीच असणार. तो उंचापुरा, लांबून तरी दिसायला देखणाच. पांढरा शुभ्र शर्ट, त्याच्यावर साहेबी झोक दाखवणारा टाय. तीही बहुतेक ऑफिसमधूनच येत असणार. ठेंगणी ठुसकी, पण हिल्स च्या शिड्या लावून उंच झालेली, तरीही सुंदर. साधारण पस्तिशीच्या आसपास वाटणारी ती दोघं. चालत चालत कडेच्या पंधरा मजली बिल्डिंगच्या समोर येऊन पोचली.
" घर आलं." ती जरा निराशेनेच म्हणाली
" हं"
" .... "
" छत्री शेअर केल्याबद्दल थँक्स"
" थँक्स काय त्यात? तू भिजणार त्यापेक्षा एक छत्री दोघांत काय वाईट आहे? "
" हं. इथे राहतेस तू"
" हो"
" तू? "
" ...... "
" बरं थँक्स फॉर द कंपनी"
" थँक्स फॉर द अंब्रेला"
" नुसतं थँक्स चालणार नाही"
" मग? "
" हाऊ अबाउट अ कॉफी? "
" डन. पण एका अटीवर"
" शूट"
" थँक्स फॉर अंब्रेला जसं नुसतं चालत नाही, तसं थँक्स फॉर द कंपनी पण नुसतं चालणार नाही"
" बरं. मग?"
" हाऊ अबाउट अ कॉफी? "
" डन. पण एका अटीवर"
" शूट"
" मी आता कॉफी देईन, आणि तीसुद्धा इथेच माझ्या घरी"
" ..... "दोघंही खळखळून हसले. तिथे तिची छत्री बंद केली. ती दोघं बिल्डिंगमध्ये शिरली. मिटलेल्या छत्रीतून सांडणाऱ्या पावसाने त्यांचा पाठलाग केला. दोघं लिफ्टमध्ये शिरली. तिचा मजला आला. त्याने स्त्रीदाक्षिण्य दाखवत तिला प्रथम बाहेर जाऊ दिलं. लिफ्टचं दार लावून तोही तिच्यामागे चालू लागला. तिच्या हिल्सचा खालच्या लादीवर होणारा आवाज तेवढाच काय तो ऐकू येत होता. लिफ्टच्या दुसऱ्या टोकाला बरोब्बर समोर असलेल्या अपार्टमेंटचा दरवाजा तिनं तिच्याकडच्या चावीनं उघडला.
" ये ना" ती त्याला म्हणाली
" थँक्स"
" ये बस" सोफ्याकडे हात दाखवत ती त्याला म्हणाली. तिच्या डाव्या हाताच्या बोटातल्या अंगठीचा हिरा चमकलेला त्याने पाहिला.
" पाणी आणू? "
" नको. पावसात अखंड भिजलोय आपण. मी सोफ्यावर बसत नाही. तुझा सोफा खराब होईल"
" अरे बस. त्यात काय? पाणीच तर आहे. वाळेल. तू बस. मी आलेच पटकन कॉफी घेऊन"सोफ्यावर बसण्याआधी पुन्हा तो दाराजवळ गेला. तिथे पायपुसणं होतं, त्याला खसखसून पाय पुसूनच तो आत आला. सोफ्यावर बसला. घराची सजावट खूप सुंदर केली होती तिने. कलात्मक वृत्ती जिथे तिथे दिसून येत होती. अगदी भिंतीवर लावलेलं चित्र असो किंवा शोकेसमधली गणपतीची मूर्ती असो. सगळ्या घरात असणाऱ्या ह्या गोष्टी तिच्या घरात मात्र वेगळ्या दिसत होत्या. टेबलावरच्या फ्रेमनं त्याचं लक्ष वेधून घेतलं. तिचा फोटो. काळेभोर केस. मोठे जिवंत डोळे, अगदी आरशासारखे नितळ आणि खरे. डाव्या गालाला पडलेली खळी. आणि तिचं ते दिलखेचक हास्य. फोटो पाहून त्याच्याच चेहऱ्यावर हसू उमटलं.
" काय रे कुठे हरवलास? " तिच्या प्रश्नानं तो भानावर आला.
" काही नाही. सहजच. घर खूप छान आहे तुझं"
" मग असायलाच हवं. माझं आहे ना? "
" हं. बरोबर. छान लोकांचं सगळंच छान असलंच पाहिजे. "
" .... "
" बरं झालं भेटलीस नाहीतर भिजलो असतो मी"
" अजून भिजायचं काही राह्यलंय का? थांब मी तुला टॉवेल आणून देते"
" अगं नको आय ऍम ऑल राईट"
" असं कसं थांब."त्याला तसंच बसवून ती आतमध्ये गेली. कपाट उघडून टॉवेल शोधत राहिली. मग काहीतरी आठवल्यासारखं कपाट तसंच सोडून बाथरुमकडे गेली. बाथरुममध्ये आतल्या हुकला टॉवेल लावला होता. टॉवेल घेऊन ती बाहेर गेली. त्याला टॉवेल दिला. तिच्या घरी ओपन प्लॅन किचन होतं. तशीच ती किचनमध्ये कॉफी कुठपर्यंत आली ते पाहायला गेली. कॉफी मगांत ओतताना तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं. टॉवेलने पुसल्याने केस उभे राहिले होते. पावसाचं पाणी तसंच वाळल्यावर येते तशी पांढरट झाक चेहऱ्यावर होती. घारे डोळे, धारधार नाक. कॉफी ओतता ओतता तिने सगळं डोळ्यात साठवून घेतलं. त्याच्या हातात कॉफी देत ती त्याच्या समोर जाऊन बसली
" थँक्स" तो म्हणाला
" पुन्हा थँक्स? "
" सॉरी... कॉफी छान झालेय"
" .. "
" तू काय करतेस. म्हणजे आमच्या ऑफिसच्या इथे कशी काय? "
" कुणालातरी भेटायचं होतं. आधी ठरलं होतं. म्हणून आले होते"
" मग झाली का भेट? "
" हो झाली ना आणि मी कॉपीरायटर आहे. ऍड एजन्सीत"
" हं. इंटरेस्टिंग"
" तू"
" मी नथिंग इंटरेस्टिंग. मी आयटी मध्ये आहे. प्रोजेक्ट मॅनेजर बट नथिंग लाइक बीइंग अ कॉपीरायटर. टोटल बोअर"
" असं काही नाही. मला असं वाटतं, लोकांना सांभाळणं आणि त्यांच्याकडून काम करून घेणं इज इक्वली क्रिएटिव्ह"
" असेलही. पण मला नाही आवडत. माझा ओढा क्रिएटिव्ह फिल्डकडं जास्त आहे"
" लाइक? "
" लाइक एनिथिंग क्रिएटिव्ह. काहीही म्हणजे रेडिओ जॉकी पासून फॅशन डिझाइनिंग पर्यंत काहीही. पण नॉट प्रोजेक्ट मॅनेजमेंट"
" दूरून डोंगर साजरे. आपल्याकडे नाही ते आपल्याला नेहमीच हवंसं वाटतं"
" असेलही. पण जे नाही ते एकदा मिळवून पाहायला काय हरकत आहे? "
" अग्रीड. पण हातचं सोडून पळत्याच्या मागे लागलं आणि तेही नाही मिळालं आणि होतं तेही हातचं निसटलं तर?"
" हं"पुढे काय बोलायचं ह्यावर दोघंही विचार करत बसले.
" कॉफी छान झालेय" तो काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाला.
" मगाशी सांगून झालं तुझं. आता दुसरी काहीतरी काँप्लिमेंट दे. इथे काँप्लिमेंट देण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आहेत की नाही?"
" हो. बरं. ते पेंटिंग खूप छान आहे"
" आणि? "
" आणि तुझं घर छान आहे"
" आणि? "
" ती फ्रेम छान आहे"
" फक्त फ्रेम की आतला फोटोही"
" फोटोच म्हणजे"
" माझा आहे"
" समजलं"
" मग? "
" मग? मग रिकामा झाला. कॉफी संपली"
" हो माझीही"
" बरं नाऊ माय टर्न. तशीही माझ्याकडून एक कॉफी ड्यू आहेच. मी बनवू? "
" बनव की. त्यात काय. फक्त कॉफी साखर सापडली म्हणजे झालं"
" सापडेल. डोंट वरी" तो किचनमध्ये शिरला. तिने केलेल्या कॉफीच भांडं तसंच ओट्यावर होतं. गॅस सुरू करेपर्यंत तरी काही अडचण आली नाही. धडपडत त्याने कॉफी बनवलीच. संपूर्ण वेळ ती त्याच्याकडे एकटक पाहत होती. त्याची प्रत्येक हालचाल डोळ्यात साठवून ठेवत होती. तो परत येऊन टेबलावर ठेवलेले मग किचनमध्ये घेऊन गेला. तिच्या आणि त्याच्या दोघांच्या मगांत त्यानं कॉफी ओतली आणि परत बाहेर आला.
" हं कॉफी इज रेडी. आयला पण एक प्रॉब्लेम झाला. तुझा मग कोणता आणि माझा कोणता हे मी विसरलो"
" विसरलास? " तिने उसनी काळजी आणून विचारलं.
" हो"
" बरं. मी नाही विसरले. उजव्या हातातला तुझा आणि डाव्या हातातला माझा"
" कशावरून? "
" मी बघत होते अख्खा वेळ मगांकडे."
" ... "
" अरे चालेल रे. एवढं काय उष्ट्या मगाचं."
" मला चालेल गं. पण तुला चालेल नाही चालणार माहीत नव्हतं"
" चालेल"तिला मग देऊन तो पुन्हा आपल्या जागी जाऊन बसला
" तुला कॉफी आवडते" तिने विचारलं
" विशेष नाही. पण चालते"
" अरे मग सांगायचं की चहा केला असता"
" नको चालतं. तुला आवडते?"
" भरपूर. कॉफीवर मी दिवस दिवस काढू शकते. नव्हे काढतेच. अरे ऑफिसमध्ये कधी कधी काही सुचतंच नाही. आमचं काम म्हणजे एकेका ओळीसाठी झगडायला लागतं दिवस दिवस. मग काय? काही सुचत नसलं की मी आणि कॉफी, कॉफी आणि मी"
" हं. मला कॉफी आवडत नाही असं नाही. पण चांगली कंपनी असेल तर आवडते. एकट्याला फारशी आवडत नाही. "
" माग आज आवडतेय की नाही? "
" कोण? "
" कॉफी? "
" हो. नक्कीच. "
" गूड. आता मला सांग आधी कधी आवडली होती आजच्या. कॉफी? "
" जाऊदे गं. कॉफीचं काय? कधी आवडते कधी नाही आवडत"दोन क्षण शांतता पसरली. हातातला मग सावरत तो उठला आणि उगाचच खिडकीकडे गेला. बाहेर पाऊस पडतच होता. निसर्गवृत्ती मोहरून आल्या होत्या. ती त्याच्या बाजूला कधी येऊन उभी राहिली त्याला कळलंही नाही. पण जेव्हा कळलं, तेव्हा तिचं नुसतं त्याच्या बाजूला असणंही त्याला भयंकर उष्ण वाटलं. आणि तिलाही.
" आर यू सिंगल? " त्याने विचारलं
" ... "
" आर यू? "
" आय ऍम मॅरिड"
".... "
" तू?"
" तो आहे कुठे?"
" ... "
" ... "
" असेल ऑफिसात. तुमच्या आयटीवाल्यांचं काही सांगता येतंय का? अमेरिकेत बसलेल्या लोकांचे तुम्ही बांधलेले. त्यांच्या वेळांवर तुमची कामं चालायची."
" हं"
" तू सांगितलं नाहीस? "
" काय? "
" आर यू सिंगल? " तिने विचारलं
" नो. आय ऍम मॅरिड टू. पण तुझ्याकडे बघून वाटत नाही की तुझं लग्न झालं असेल म्हणून"
" हं. तुझ्याकडेही"
" रिअली?"
" ... "
" तुझी बायको कुठाय? म्हणजे काय करते"
" काम करते. तिचं सगळं विचित्रच आहे. एकदा का ती कामात बुडली की दिवस दिवस बुडलेली राहते. खरंतर आज आमची ऍनीव्हर्सरी आहे"
" मग आज तिच्याबरोबर-"
" नाही. छत्री तुझ्याकडे होती ना? मग तुझ्याबरोबर आणि वर कॉफीही सो"
" .... "
" .... "
" एक सांगू? आज माझीही ऍनिव्हर्सरी आहे" ती म्हणाली
" ...... " तो काहीच बोलला नाही
" आर यू अनहॅपी? " तिने विचारलं.
" नो नाही. अगं आय ऍम नॉट अनहॅपी बट-"
" यू कॅन बी हॅपीअर, राइट? "
" बरोबर. तू?
" अरे मीपण. आय ऍम नॉट अनहॅपी. बट आय कॅन बी हॅपीअर"
" आवडतो तो तुला"
" मनापासून. आहे मनोहर तरी वाचलंयस? "
" नाही. मला मराठी पुस्तकं वाचायला आवडत नाहीत पण ती मात्र आवडते"
" मला तो आवडतो. तुला ती आवडते, पण तरीही आपण दोघं असे इथे? "तो आणि ती एकमेकांकडे बघतात. ती एक पाऊल पुढे होते. तोही एक पाऊल पुढे होतो. दोघांचे डोळे एकमेकांच्या डोळ्यात गुंतलेले. तो तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ ओढतो. एकमेकांचा श्वासातला कॉफीचा वास एकमेकांचा नाकात जातो. आवेगाने तो आपले ओठ तिच्या ओठांवर टेकतो. तीही प्रतिसाद देते. आजूबाजूचं जग क्षुल्लक बनतं. कैक क्षणांनी त्यांची ती समाधी भंग पावते. तिच्या डोळ्यात नजर रोखून तो म्हणतो
" हॅपी ऍनिव्हर्सरी"
" हॅपी ऍनिव्हर्सरी" ती म्हणते
" यू कॅन बी हॅपिअर हे सरळही सांगता आलं असतं"
" तुलाही. पण कधी कधी अनोळखी होऊन पाहिलं की ओळखीची माणसं अधिक चांगली समजतात असं नाही वाटत तुला?"
" नक्कीच. अब इस बात पे एक कॉफी हो जाये"
" ओके. बनवतोस?"
" मॅडम. तुमची टर्न"
" ओके"

Khup Sundar.. anolakhi asatana Prem jast asata asa sangaycha ahe ka ?
ReplyDelete