अनेकदा आपल्या आयुष्यात माणसं का आणि कशी येतात आणि आपण त्यांच्या रंगात कधी आणि कसं रंगून जातो तेच कळत नाही. वेगवेगळ्या व्यक्ती त्यांच्या परीनेआपले आयुष्य घडवत असतात. अनेकदा मी विचार करते की कितीतरी लोकांचा असा ठसा माझया आयुष्यावर आहे.अनेक नात्यांशीवाय मी अपूर्ण आहे. अनेकव्यक्तींशीवाय माझया आयुष्याला काही अर्थ नाही.
तरीही नात्यांची गुंतागुंत ही होतेच. एक अधिक एक दोन असं नेहमीच घडत नाही. काही असच घडलं होतं माझयाबाबतीत. हरवून बसले होते मी नात्यांचे अर्थ . अनेकगोष्टी अकारण वाटू लागल्या होत्या मला. "लाइफ ईज़ ब्यूटिफुल" हे स्वत:चे वाक्य मी विसरले होते. आयुष्यातून रस हरवणे म्हणजे या पेक्षा वेगळं काही नाही.
आजकाल कोणतीही नवीन ओळख होताना मला पहिला प्रश्न पडत होता तो "का? कशाला? नकोच ना पुन्हा सारं तेच". जवळपास मी टाळतच होते नवीन माणसं आणिनवीन ओळखी.
तरीही तू अवचित येणार्या पावसासारखा आलास.... तुझया मैत्रीच्या वर्षावाने चिंब भिजून पुन्हा बहरून आले. तू पुन्हा एकदा मला हसायला शिकवलेस, पुन्हा एकदानात्यांचे अर्थ नव्याने तपासून पाहायला लावलेस, पुन्हा एकदा आयुष्याकडे पाहण्याची नवीन दृष्टी दिलीस.... कदाचित हे सारं तुझया नकळत घडलं असेल.
मैत्री वेगळी काय असते...एकमेकांच्या साथीने एकमेकाना समृद्ध करणं हीच तर मैत्री! आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट. कदाचित प्रेमाचा बहर उतरत असेल काही काळानंतर, प्रेमाचे रंग बदलत असतील, कदाचित फिकेही होत असतील.......पण मैत्रीचं तसं नाही. एकमेकान सोबत नसताही आपण सोबतच असतो, अनेकदा शब्दांविनाही मनं ओळखता येतात, कोणीतरी आपलं ही भावनाचं मोठी सुखवणारी असते अन् तरीही प्रेमातली बंधिलकी नसते. आज पुन्हा एकदा नव्याने आयुष्याकडेवेगळ्या नजरेने पुन्हा पाहता येताय मला ते फक्त तुझयामुळे!!!

No comments:
Post a Comment
हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!