Showing posts with label चारोळी. Show all posts
Showing posts with label चारोळी. Show all posts

Friday, April 27, 2012

माझी मी ......


अनेकदा मी माझ्याच पाऊलखुणा पुन्हा पुन्हा शोधत राहते
त्याच जुन्या वळणांवर आठवणी नव्याने जागवू पाहते ||
अनेकदा मी मलाच विसरू पाहते
अन श्वासांची गणिते मांडत राहते ||
अनेकदा मी साधं सरळ सोपं जगायचं नाकारू जाते 
अन याच जन्मी पुन्हा नव्याने रुजू पाहते ||

Tuesday, January 10, 2012

तुझं आकाश

तुझं आकाश माझ्या डोळ्यांपेक्षा वेगळं असतं का?
आकाशात बुडून जाताना तुला घड्याळ दिसतं का?
दोघं सोबत असता काळ थांबतो आपल्यासाठी
दोघांखेरीज बाकी जगही असतं, सांग हे तुला कधी स्मरतं का?

Wednesday, June 22, 2011

आठवणी

युगे सरली आहेत तुला आठवताना

पण हल्ली मी तुला आठवतच नाही

सारं काही आता पुसट होत चाललंय

कारण माझया मनाचं सारं अवकाशच तू व्यापलयस

Tuesday, June 21, 2011

मनातलं गाणं

प्रत्येकाच्या मनात एक गाणं असतं
प्रत्येकाच्या स्वप्नातलं एक गाव असतं
स्वप्नातील गावाची वाट काही संपत नाही
मनातलं गाणं ओठी येण्यासाठी सच्चे सूर लागत नाहीत



Wednesday, May 18, 2011

नाही भीती मला काळ्या ढगांची
नाही बरसणार्‍या धारान्ची ||
काळजी मला ओढ घेणार्‍या पावलान्ची
बहकणार्‍या वेड्या मनाची ||

Monday, May 16, 2011

वेड्या मना

वेड्या मनाची तरहाच काही निराळी
सुखे आनंदे भरता आणी डोळा माझया पाणी ||
दु:खाला मी कवेत घेऊ पाहता
मनी काळे ढग आणि कोरडीच तळी ||

Monday, May 2, 2011

आठवणी

तुझया आठवणींचा मनात एकच एक गलका
त्यातच डोळ्यातही बघ पाऊस हलका हलका
तुझया आठवणींना येऊ नका सांगणं म्हणजे
वसंतात बहाव्याला फूलू नको अस सांगणं

Wednesday, April 6, 2011

रिमझिमता पाऊस

त्याला आवडतात दाटून आलेले ढग
आणि बरसणारा पाऊस इतके की
सारे ढग आता माझया मनात
आणि रिमझिमता पाऊस माझया डोळ्यात